भाजप सत्ता पिपासू,साम दाम दंड भेद वापरून सत्ता मिळविण्याची भूमिका: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -महाविकास आघाडीत जे व्हायचे ते होईल मात्र जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहे. जनतेचे प्रश्न सोडविले गेले पाहिजे. भाजप सत्ता पिपासू आहे. साम दाम दंड भेद करून सत्ता मिळविण्याची भूमिका भाजप सरकारची आहे. सरकार झोपा काढत आहे का?,’ असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपवर टीका केली आहे
नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी अकोला हिंसाचार प्रकरणावरुन सरकारवर टीका केली. त्यांनी सांगितले की,’महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वस्तुस्थिती माहीत करण्यासाठी आणि त्याठिकाणी आहे कोण याची माहिती घेण्यासाठी मी अकोला येथे जात आहे.
लोकांनी संयमाने आणि शांतीने राहण्याचे आवाहन करणार आहे.’तसंच, ‘राज्यात सत्तेचा वापर आणि दुरुपयोग केला जात आहे. असा कधीच पहिला नव्हता. कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र. काय चालले आहे महाराष्ट्रात.’, असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला
. ‘. ‘महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघावर आमचं लक्ष आहे.प्रमाणेच किंबहुना अधिक ताकदीने आम्ही लढणार आहोत.’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहेअकोल्यातील हिंसाचाराच्या (Akola Clash) घटनेवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जोरदार टीका केली आहे. ‘महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असा महाराष्ट्र कधीच पहिला नव्हता, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र, काय चालले आहे महाराष्ट्रात’, अशा शब्दात नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहेदरम्यान, अकोल्यातील जुने शहरात 12 मे रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे. दोन गटात झालेल्या वादात जमावाकडून दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरु केले असून आतापर्यंत 150 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील अर्ध्याहून अधिक आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर 300 पेक्षा जास्त जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.