खंडणी व फसवणुक प्रकरणी : बाबाराजे देशमुख ला अटक

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – २०१९ च्या मावळ लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि सोशल मिडियात सक्रिय असलेला प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख (वय 33, रा. मु.पो. बेबडओव्हळ, ता. मावळ, जि. पुणे) याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आज अटक केली . त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश मावळ न्यायालयाने दिला आहार

बाबाराजेची 5एकर जमीन बेबड ओहळ येथे वनीकरणात आहे. त्यातील २५ गुंठे जमीन त्याने रविंद्र शिवाजीराव देशमुख (वय ४८, रा. वडगाव बुद्रूक, ता. हवेली, जि. पुणे) या सिव्हील इंजिनिअरला २५ लाख रुपयांना दिली होती. मात्र, वनजमिनीचे प्लॉटिंग होत नाही. त्यामुळे तिचे खरेदीखत होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे देशमुखांची फसवणूक झाली होती

.पैसे देऊनही खरेदीखत होत नसल्याने त्यांनी त्यासाठी तगादा लावला. त्यावर त्याकरिता आणखी ७० लाख रुपये बाबाराजेने मागितले. ते न दिल्यास वा पोलिसात गेल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याने पाच लाख रुपये खंडणी उकळली होती.

२०१३ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान ही घटना घडलेली आहेदरम्यान, काल यासंदर्भात गुन्हा दाखल होताच बाबाराजेला शिरगाव  लगेच अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. खंडणी व फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यात एकाच दिवसाची पोलिस कोठडी मिळाल्याबद्दल आश्चर्य वर्तविले जात आहे. पीएसआय कांबळे पुढील तपास करीत आहेत.

Latest News