संसद भवन निर्मितीचा निर्णय घेताना आम्हाला विचारल नाही :शरद पवार

“ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – विरोधी पक्षातील सभासदांना निमंत्रण दिलं की नाही माहीत नाही. माझ्या हातात निमंत्रण आले नाही.पण माझ्या दिल्लीच्या घरी पाठवलं असेल तर मला माहित नाही. पण माझ्या हातात निमंत्रण आलं नाही. असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे की नाही हे सरकारने संसदेत मांडलं नाही.या प्रकल्पाबाबतची चर्चा मर्यादित लोकांशी केली असावी. पण आम्हाला सांगितलं नाही. इतकी मोठी गोष्ट करताना त्यांनी सर्वांना विचारात घ्यायला हवं होतं,” असे पवार म्हणालेपवार म्हणाले, “दिल्लीत कोणीही आले तर नव्या माणसाला संसद, राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट दाखवले जातात. संसदेचं एक्झिबिशन आहे. त्याला लोक भेटतात. त्यातून देशाचा इतिहास मांडला जातो. त्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे का अशी शंका आहे. जी जुनी संसद आहे. त्याबद्दल आमची आस्था आहे. आमची बांधिलकी आहेनव्या संसद भवनाचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना या ऐतिहासिक सोहळ्याचे आमंत्रण दिले नसल्याने विरोधकांनी आजच्या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला. या उद्धघाटन सोहळ्यावर 21 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या या उद्धघाटन सोहळ्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, ” सध्या देशात जे काही सुरू आहे, ते लोकशाही विरोधी आहे. संसद भवन निर्मितीचा निर्णय घेताना आम्हाला विचारात घेण्यात आले नाही,” हा सोहळा मर्यादित घटकांसाठीच होता की काय अशी शंका आहे, अशी टीका शरद पवारांनी यावेळी केलीया नव्या संसद भवनाच्या सोहळ्यावर काही विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राष्ट्रीय जनता दलाने संसदेच्या या नव्या इमारतीवरुन टि्वट करीत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Latest News