भुवनेश्वर राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अॅथ्लेटिक्स स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा २८ खेळाडूंचा संघ जाहीर…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – ओरीसा येथील भुवनेश्वर येथे पुढील महिन्यात दि.१५ ते १९ जून या कालावधीत संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अॅथ्लेटिक्स स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा २८ स्त्री व पुरुष खेळाडूंचा संघ आज महाराष्ट्र अॅथ्लेटिक्स असोसिएशनने जाहीर केला. यामध्ये १५ पुरुष व १३ महिला खेळाडूंचा समावेश आहे. पुण्यात दि.२१ ते २३ मे या कालावधीत संपन्न झालेल्या ७१व्या राजपथ महाराष्ट्र वरिष्ठ अॅथ्लेटिक्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड समितीने महाराष्ट्र टीमसाठी निवड केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र अॅथ्लेटिक्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सतीश उचिल यांनी दिली. महाराष्ट्राच्या टीममध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले खेळाडू असून भुवनेश्वर येथे महाराष्ट्र टीम उत्कृष्ट कामगिरी करेल असा विश्वास सतीश उचिल यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र टीममधील खेळाडू पुढीलप्रमाणे :

पुरुष गटात १५ खेळाडूंचा समावेश असून नाशिक, मुंबई-उपनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील प्रत्येकी दोन आणि पुणे, मुंबई-शहर, औरंगाबाद, नागपूर, अकोला येथील प्रत्येकी एक खेळाडू आहेत.
पुरुष संघाचा कप्तान राहुल कदम असून महिला संघाची कप्तान संजीवनी जाधव आहे.
पुरुष संघात प्रणव गुरव(पुणे ), सौरभ नैताम(अकोला), जय शहा, राहुल कदम (मुंबई-उपनगर). शुभम देशमुख, कुशल मोहिते (सातारा), प्रकाश गदादे, उत्तम पाटील(सांगली), ओमकार कुंभार, सिद्धांत पुजारी(कोल्हापूर), तेजस शिरसे(औरंगाबाद), शुभम भंडारे(नाशिक), राजन यादव(नागपूर), सर्वेश कुशरे(नाशिक), अक्षय घोंगे (मुंबई शहर).

महिलांच्या गटात १३ खेळाडूंचा समावेश असून मुंबई-उपनगर आणि नाशिक मधून प्रत्येकी चार, पुण्यातून दोन आणि पालघर, नागपूर, ठाणे मधून प्रत्येकी एक खेळाडू आहेत.

महिला संघात अवंतिका नराळे, किरण भोसले (पुणे), शिवानी गायकवाड(पालघर), निधी सिंग(ठाणे), ऐश्वर्या मिश्रा, शर्वरी परुळेकर, पूर्व सावंत, अभा खटुआ(मुंबई-उपनगर), यमुना लडकत, पूनम सोनुने, संजीवनी जाधव, कोमल जगदाळे(नाशिक), प्राजक्ता गोडबोले(नागपूर).

Latest News