पुणे आणि खडकी कँन्टोन्मेंट परिसरातील रहिवासी भाग, बोर्डातील कर्मचाऱ्यांना महापालिकेत सामावून घेण्याबाबत हालचाली सुरू….


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पुणे आणि खडकी कँन्टोन्मेंट परिसरातील नागरी रहिवासी भाग तसेच, कँन्टोन्मेंट बोर्डातील कर्मचाऱ्यांना महापालिकेत सामावून घेण्याबाबत हालचाली सुरू आहेत. कँन्टोन्मेंट परिससरातील शाळा, रूग्णालये, मोकळ्या जागा व इतर काही आस्थापने यांना सामावून घेण्यासाठी नियमावली, त्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर चर्चेची शक्यता आहे
राज्यातील योल कँन्टोन्मेंट भागाचा बाजूला लागून असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत समावेश करण्यात आले. योल कँन्टोन्मेटच्या लष्करी परिसर वगळून राहिलेला सर्व रहिवासी भागाचे स्थानिक स्वराज्य संस्थेत (Local Body) विलिनिकरण करण्यात आले. याच धर्तीवर आता, पुणे आणि खडकी कँन्टोन्मेंट भागाच्या विलिनीकरणासाठी हालचाली सुरू आहे
राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडून कँटोन्मेट रहिवासी विभागाचा अहवाल, पाठवण्यात यावा असा आदेश देण्यात आले आहे. मात्र याबाबत अजूनही राज्य शासनाला अहवाल पाठवण्यात आलेला नाही. या अहवालासाठी राज्यशासनाने मनपाला एकूण चार वेळा अहावाल पाठविण्याबाबत सूचना केल्या,
पण महापालिकेकडून अहवाल देण्याबाबत कार्यवाही करण्यात आली नाही पुणे छावणी आणि खडकी छावणी परिसर याचे महानगरपालिकेत विलिनीकरण व्हावे, यासंदरभात आजै बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि पुणे आणि खडकी कँन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी याबाबतीत चर्चा करणार आहे
बैठकीत काय चर्चा होऊ शकते?
* विलिनीकरणानंतर महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे चटई क्षेत्र निदेशांक लागू होणार का?
* मोकळ्या जागा महानगरपालिकेच्या ताब्यात येणार का?
* कँन्टोन्मेंटच्या कर्मचाराऱ्यांना महापालिकेत सामावून घेण्याची प्रक्रिया काय?
* शाळा रूग्णालये पालिकेच्या अखत्यारीत येणार का?