पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे यांचा शिरूर लोकसभा मतदार संघावर दावा

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याने पक्षाने तेथे नव्या उमेदवाराची चाचपणी सुरु केली आहे.भोसरीचे प्रथम आमदार आणिमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे यांनी शिरूरवर दावा ठोकला आहे. त्यांनी तेथून उमेदवारी मागितली आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयातत सुरु असलेल्या लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकीदरम्यान अजित पवारांची भेट घेत ही मागणी केली

त्यातून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू व मर्जीतील असे राज्याचे माजी गृहमंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे

पिंपरी : एक वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच सुरु केली आहे. त्यांनी गेल्या दोन दिवसांत लोकसभा मतदारसंघनिहाय मुंबईत आढावा घेतला. त्यात मावळचा आढावा आज झाला. तर शिरूरचा नंतर होणार आहे. मात्र, शिरूरच्या आढावा बैठकीपूर्वीच शिरूरमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे.

२००९ च्या लोकसभेला शिरूरमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते त्यांना मिळालेली आहेत. लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त (१ जून) लागलेल्या होर्डिंग्जमधून त्यांच्या कार्यकर्त्यांनी २०२४ च्या शिरूर लोकसभेची जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसून आले आहे

. त्यावर संसदेची इमारत दिसत आहे. विशेष म्हणजे, या फ्लेक्समधून खासदार कोल्हे गायब आहेत. त्यात आता ते आगामी लोकसभा लढणार नसल्य़ाचे संकेत मिळत आहेतगेल्या वर्षभरापासून डॉ.कोल्हे यांचे वागणे पक्षाशी चार हात अंतर राखूनच राहिलेले आहे

. पक्षाच्या कार्यक्रमांपासून ते दूर राहत आहेत. हे पक्षाचे एकनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खटकत आहे.त्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी सलोखा निर्माण केल्यामुळे कोल्हेंच्या उमेदवारीबाबततील मोठा गट उदासीन आहे. त्यामुळे निष्ठावंत लांडेंचे ट्रम्प कार्ड राष्ट्रवादी खेळेल

Latest News