माझी बाजू ऐकून न घेताच हे प्रकरण निकाली कसं काढलं? गृहमंत्री फडणवीस उत्तर द्या :सुषमा अंधारे


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रकरणात त्या आमदाराने क्लिनचीट दिली असल्याचं सांगितलंय. मी असभ्य लोकांशी बोलत नाही. पण देवेंद्रजी, तुम्ही एक अभ्यासू आहेत. त्यामुळे मी त्यांच्याशी बोलतेय. ही क्लिनचीट कशी दिली गेली. याबाबत खुलासा करावा असंही अंधारे म्हणाल्या
शिरसाटांवर टीकेची झोड उठवतानाच थेट देवेंद्र फडणवीसांनाही काही सवाल केले आहेत.
, देवेंद्र फडणवीस एक संवेदनशील व्यक्ती आहेत. गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून त्यांना ह्या सर्व गोष्टी कळत असतील. ते गृहमंत्री म्हणून सरकारची बाजू घेतील. पण मी वकील म्हणून त्यांना प्रश्न विचारते आहे
मला कुठलीच माहिती न देता, माझी बाजू ऐकून न घेताच हे प्रकरण निकाली कसं काढलं? गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून त्यांना ह्या सर्व गोष्टी कळत असतील. फडणवीसांनी वकील म्हणून उत्तरं द्यावीत
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते व आमदार ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंविषयी एक आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याविरोधात अंधारेंनी परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी शिरसाट यांना क्लिनचीट दिली आहे.
यावरुन आता सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे.ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाटयांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या,
सुषमा अंधारे तपास समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्या पत्रकार परिषदेत रडल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कारण त्या चांगल्या अॅक्टर आहेत. मी एक छोटा कार्यकर्ता आहे.
त्यामुळे हा अहवाल कोर्टात जाईल, तेव्हा त्यांनी बाजू मांडावी असं शिरसाट म्हणाले होते. तसेच मी वारंवार सांगितलं होतं, मी काहीही चुकीचं वक्तव्य केलेलं नव्हतं. एखाद्याला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे