राज्याभिषेक सोहळा निमित्ताने ”प्रतापगड” प्राधिकरण म्हणून घोषणा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
शिवराज्याभिषेकानिमित्ताने शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी, रायगडाच्या पायथ्याला शिवसृष्टी उभारण्याची मागणी केली होती. त्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले. तर गोगावले यांची ही मागणी मान्य करत मुख्यमंत्र्यांनी शिवसृष्टीची घोषणा केली.
”आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, आज या ऐतिहासिक सोहळ्याला ३५० वर्षे झाली. मी स्वत:ला भाग्यवान समजतो, की या सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं.
त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य लोकांचं काम कऱण्याची संधी आपल्याला मिळाली, अशा भावना उदयनराजे भोसले यांनी प्रतापगड प्राधिकरणाची मागणी केली होती.
आजच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा केली. तसेच, “आज लंडनच्या संग्राहलयात महाराजांची भवानी तलवार आणि वाघनखं आहेत. तीही भारतात परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तीही महाराष्ट्रात लवकरच परत येईल, असंही त्यांनी सांगितलं
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेक सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापगड प्राधिकरण म्हणून घोषणा केली. खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्षपदाच जबाबदारी असतील, असेही त्यांनी यावेळी सांगितलं
.तर आजच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने राज्यातील सहा महसुली क्षेत्रात ५० कोटी रुपयांचा निधी देऊन शिवरायांच्या जीवनावर आधारित उद्याने उभारणार, असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासोबतच राजधानी दिल्लीत शिवरायांचं राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी आम्ही पंतप्रधानांकडे मागणी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.