११ जून रोजी पुण्यात गांधी दर्शन शिबीराचे आयोजन


*११ जून रोजी पुण्यात गांधी दर्शन शिबीराचे आयोजन*
पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. ११ जुन २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर होणार असून डॉ. राम पुनियानी,डॉ. कुमार सप्तर्षी,युवराज मोहिते हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.’
गांधी और सांप्रदायिक सद्भावना’विषयावर ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राम पुनियानी मार्गदर्शन करणार आहेत. ‘सत्याग्रह शास्त्र’ विषयावर डॉ.कुमार सप्तर्षी,तसेच ‘गांधी-आंबेडकर विचारांचा वारसा आणि महत्व’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते मार्गदर्शन करणार आहेत.’गांधी दर्शन’ विषयावरचे हे तिसरे शिबीर आहे.
https://forms.gle/7HdWHS2ADp144WkTA या गुगल फॉर्मवर नावनोंदणी करता येणार आहे.अधिक माहितीसाठी सुदर्शन चखाले (प्रकल्प प्रभारी) – ७८८७६३०६१५,संदीप बर्वे (विश्वस्त सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ) – ९८६०३८७८२७,सचिन पांडुळे (अध्यक्ष, युवक क्रांती दल पुणे शहर) – ९०९६३१३०२२ यांच्याशी संपर्क साधता येईल.शिबिरासाठी शंभर रुपये नोंदणी शुल्क आहे. त्यात शिबिरस्थळी नाश्ता,चहा आणि भोजनाचा समावेश आहे.