मुलीच्या प्रियकरासोबत मिळून महिलेने पतीचा खून करून पेट्रोलनी जाळला….

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -पुण्यातून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रियकरासोबत मिळून महिलेने आपल्याच पतीचा खून केलाय . जॉय लोबो असं मृताचं नाव असून आरोपी पत्नी सॅन्ड्रा लोबो आणि तिच्या मुलीचा प्रियकर ॲग्नेल कसबे यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.मुलीचं प्रेमप्रकरण लपवण्यासाठी आईनेच मुलीच्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढल्याची माहिती समोर येत आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला

एक अल्पवयीन मुलगी आहे. या मुलीचे ॲग्नैल कसबे नावाच्या मुलांसोबत प्रेमसंबंध होते. अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध असल्याचं समजल्यावर जॉय लोबो याने पत्नी, मुलगी आणि तिचा प्रियकर या तिघांना मारहाण केली होती. मारहाणीचा राग मनात ठेवून जॉय लोबो याचा तिघांनी मिळून चाकूने खून केला.त्यानंतर त्यांनी एक दिवस त्याचा मृतदेह घरातच ठेवला. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याचा मृतदेह सणसवाडीला नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिला

आरोपी सॅन्ड्रा लोबो व मयत जॉय लोबो यांच्यातही सॅंड्रा हिचे बाहेर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून वाद होत होते. त्यामुळे जॉयचा खून करण्याआधी पत्नीने आणि मुलीने वेगवेळया क्राईम वेब सिरीज पाहून कट रचला आणि त्याची हत्या केली.

पोलिसांना जळालेल्या मृतदेहाचा तपास केल्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणलाय. आरोपी पत्नी ही पतीचा खून केल्यावर ही नातेवाईकांना संशय येऊ नये, म्हणून रोज त्याच्या फोनवरून स्टेटस अपडेट करत होती, अखेर पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे.

. मात्र पोलिसांनी 230 सीसीटीव्हींंचं फुटेज तपासत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मृतदेह पेट्रोल टाकून जाळला घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सॅन्ड्रा लोबो आणि जॉय लोबो हे पती -पत्नी असून 17 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता .

Latest News