जागतिक दृष्टीदान दिनी ‘नेत्रसेवा तपस्वी’ पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञांचा सत्कार


जागतिक दृष्टीदान दिनी ‘नेत्रसेवा तपस्वी’ पुरस्कारांचे वितरण* ————*ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञांचा सत्कार
पुणे :जागतिक दृष्टीदान दिवसाच्या निमित्ताने, पुण्यातील ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ.श्रीकांत केळकर आणि डॉ. ललित शाह यांना ‘आम्ही पुणेकर’ आणि ‘साई सामाजिक सेवा’संस्थांतर्फे ‘नेत्र सेवा तपस्वी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
शारदा विद्यापीठम् चे पं. वसंतराव गाडगीळ, कर्नल मदन देशपांडे ,आय.एम.ए. महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या नेत्र शल्य चिकित्सा शास्त्र विभागाला ही गौरविण्यात आले.’आम्ही पुणेकर’चे अध्यक्ष हेमंत जाधव, ऍड. दिलीप हांडे-देशमुख, साई सेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास काबरा, सौ.अरुणा केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
१० जून जागतिक दृष्टीदान दिनी हा कार्यक्रम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थलमॉलॉजी येथे हा कार्यक्रम झाला.ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञांना मानपत्र,पुणेरी पगडी देऊन गौरविण्यात आले.अखिल झांजले, संजय लढ्ढा, हर्ष भूतडा, सुभाष सुर्वे, प्रसाद खडागळे आदी उपस्थित होते. हेमंत जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
पं.वसंत गाडगीळ यांनी प्रास्ताविक केले. उत्तम मांढरे यांनी आभार मानले. *प्रगत तंत्रज्ञानाला समाजभानाची जोड द्या*: डॉ. श्रीकांत केळकर यांचे मत
: डोळ्यांच्या उपचारासाठी आज वैदयकिय क्षेत्रात खूप प्रगत तंत्रज्ञान आले आहे. रुग्ण आणि नातेवाईक आपल्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे आपले काम करीत असताना कितीही अडचणी आल्या तरी न थांबता त्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तंत्रज्ञान प्रगत असले तरी त्याला समाजभानची जोड असली पाहिजे.
तर सर्वसामान्य आणि गरजूंवर चांगले उपचार करता येतील, असे मत ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, पुणे शहरात नॅशनल इन्स्टिट्यूट अॉफ अॉफ्थलमॉजी सारखे मोठे आणि सुसज्ज असे हाॅस्पिटल उभे करणे म्हणजे एक तपच आहे आणि ते केळकर यांच्या सारखा तपस्वी व्यक्तीच करू शकतो. त्यांनी फक्त दृष्टीदानाचे कार्य केले नाही तर अनेक सक्षम विद्यार्थी देखील घडविले आणि आजही घडवत आहेत, असेही त्यांनी सांगितले