१७ जून रोजी ‘नृत्यात्मन’ कथक नृत्य प्रस्तुती


*१७ जून रोजी ‘नृत्यात्मन’ कथक नृत्य प्रस्तुती
नृत्यार्च ‘ संस्थेकडून आयोजन* पुणे :’मधुरीता सारंग स्कूल ऑफ कथक’ आणि ‘नृत्यार्च ‘ संस्थेतर्फे ‘नृत्यात्मन’ हा कथक नृत्य प्रस्तुतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कथक नृत्य कलाकार अर्चना अनुराधा आणि त्यांच्या शिष्या मंजुषा सोनबरसे, मानसी तिवसकर,सानिका आपटे, मधुरा देशपांडे कथक नृत्य सादर करणार आहेत. एम. ई. एस .सभागृह ,मयुर कॉलनी( कोथरूड) येथे हा कार्यक्रम १७ जून रोजी सायंकाळी साडे पाच वाजता होणार आहे
. विवेक मिश्रा(तबला) ,मनोज देसाई( गायन आणि हार्मोनियम), रश्मी मोघे (गायन),संदीप मिश्रा( सारंगी) हे साथ संगत करणार आहेत. बनारस घराण्याचे विख्यात तबला वादक पंडित अरविंद कुमार आझाद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्नेहल दामले या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.तर रंगभूषा धनश्री देशमुख यांची आहे. प्रवेश मूल्य ऐच्छिक असल्याची माहिती संयोजक अर्चना अनुराधा यांनी दिली