इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या शिबिरात


इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या शिबिरात*
वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार*पुणे : डॉ.पी. ए. इनामदार यांच्या ‘इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’(वानवडी)च्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १३ जून २०२३ रोजी हे शिबिर ७८- गुरुवार पेठ, नवयुग मित्र मंडळ, शीतळादेवी चौकाजवळ सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत सुरु होते, हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. परवेझ इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात हॉस्पिटलचे डॉ.श्रीकांत कदम,इतर तज्ज्ञ डॉक्टर्स, परिचारीका, सहाय्यक वर्ग यांनी वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करून उपचार केले ,
तसेच मोफत औषधे दिली.हॉस्पिटलचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी शिमॉन राऊत यांनी स्वागत केले. या उपक्रमाचे हे बारावे वर्ष होते