आरोग्य भारतीद्वारे वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा शिबीराचे आयोजन


*आरोग्य भारतीद्वारे वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा शिबीराचे आयोजन*
आरोग्य भारती द्वारा यंदाच्या वर्षीसुद्धा वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य सेवा शिबीराचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलेले होते. श्री ॐकारेश्वर मंदिर , पुणे येथे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडीचा मुक्काम असतो . याच ठिकाणी, श्री ॐकारेश्वर मंदिर देवस्थानच्या सहाय्याने आरोग्य भारतीद्वारा आरोग्य सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते .
आजरेकर दिंडीचे प्रमुख ह भ प कोंडकर महाराज आणि ह भ प कर्वे महाराज, फलटण यांच्या आशिर्वादाने आणि भारतीय कुष्ठ निवारक संघ चांपा संस्थेचे श्री बाळाभाऊ जोशी तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी आणि भारतमाता पुजनाने शिबिराला सुरुवात झाली.
आयुर्वेद , ॲलोपॅथी , होमीओपॅथी अशा विविध औषधोपचार पद्धतीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले.अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय,भारती विद्यापीठाचे आयुर्वेद महाविद्यालय आणि नवले दंत चिकित्सा रुग्णालय अशा विविध वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्सही या शिबीरात सेवा देण्यासाठी उपस्थित होते
. सर्व तज्ञ डाॅक्टरांनीअतिशय तळमळीने रुग्ण तपासणी करून आरोग्य सल्ला, औषधोपचार केले.या प्रसंगी आरोग्य भारतीचे क्षेत्रीय संयोजक डाॅ मुकेश कसबेकर, प्रांत उपाध्यक्ष डाॅ गिरिष कामत, प्रांत सचिव डॉ संतोष गटणे , प्रांत कोषप्रमुख सतीशजी कालगांवकर,ससुन हाॅस्पिटलच्या आँर्थोपेडिक डिपार्टमेंटचे डाॅ श्रीनिवास शिंत्रे, महाएनजीओ फेडरेशनचे शेखरजी मुंदडा, श्री ॐकारेश्वर देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर या मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन उत्साह वाढवला.
श्री ॐकारेश्वर देवस्थानाने आरोग्य सेवा शिबीरासाठी जागा उपलब्ध करुन दिली.डॉक्टर आणि कार्यकर्त्यांची महाप्रसादाची व्यवस्था श्री नितीन उत्तरकर आणि परिवाराने उत्तम केलेली होती.औषधांची उपलब्धता समाजहितैषी दात्यांनी केली होती.
सुमारे ५०० रुग्णांना तपासणी करुन औषधे देण्यात आली.जे रुग्ण वारीत पायी चालण्यास सक्षम नाहीत , त्यांना आवश्यक ते उपचार देऊन समुपदेशन करण्यात आले .वारीच्या संपूर्ण काळात निरोगी राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचार म्हणून आजरेकर दिंडी आणि कर्वे दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी होमीओपॅथीची औषधे तसेच प्रथमोपचारासाठी लागणारी औषधे आरोग्य भारतीकडून दिंडी प्रमुखांकडे सुपूर्द करण्यात आली
.आळंदी आणि पैठण येथील यात्रांमध्येही आरोग्य भारतीद्वारा वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा शिबीराचे आयोजन करण्यात येते . तसेच आरोग्य विषयक प्रबोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन आरोग्य भारती मार्फत वर्षभर सुरु असते .