आता मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय – मनीषा कायंदे 

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – शिंदे गटात नव्याने प्रवेश केलेल्या मनीषा कायंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले. मनीषा कायंदे म्हणाल्या, ‘गेली १० वर्ष मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलं. आता मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत शिवसेना ही शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे मी शिवसेनेतच आहे. मी पहिल्यांदा मतदान शिवसेनेला केलं. मी भाजपात होते, तरी काम सेनेसाठी केलंठाकरे गटाला गळती सुरूच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. काल विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. मनीषा कायंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंची साथ सोडण्याचं कारण सांगितलं. ‘अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे मी शिवसेनेतच आहे, अशी प्रतिक्रिया मनीषा कायंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिलीकायंदे पुढे म्हणाल्या,’गेली ३ वर्ष महाविकास आघाडी होती. आम्हीयांना भक्कम साथ दिली. मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही. जुन्या लोकांना कधीच महाविकास आवडली नाही. काही गोष्टी आवडत नव्हत्या. सावरकरांचा विषय होता’.’संघटनात्मक काम करण्याचा माझा पिंड आहे. पक्षाने मला मान-सन्मान दिली. मी पक्षाची भूमिका मांडली. आता पक्षाची भूमिका, विचारधारा भरकटत आहे. माझी अजून १ वर्ष टर्म आहे. संघटनेत चांगलं पद द्या. एवढीच मागणी केली. मला औरंगाबादमध्ये जबाबदारी दिली आणि त्यानंतर एका ज्युनियरला डोक्यावर बसवलं, अशी खंत कायंदे यांनी व्यक्त केली. ‘मला मनमोकळेपणाने बोलू द्या. काम करण्याची संधी द्या. अनेकांना सांगितलं. पक्षाच्या निर्णयात आम्हाला कुठेच स्थान नाही. माझी गरज उरली नाही. हे गेल्या काही महिन्यांपासून दिसत होतं. महिला आघाडीची कुचंबना होत आहे. यावर कोणी बोलत नव्हतं

Latest News