स्वरभारती:महाराष्ट्राचे लोकसंगीत ‘ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद– ‘भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम


स्वरभारती:महाराष्ट्राचे लोकसंगीत ‘ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद– ‘भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत भारती विद्यापीठ स्कुल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे आयोजित ‘ स्वरभारती :महाराष्ट्राचे लोकसंगीत ‘ या कार्यक्रमाला रविवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.
भारती विद्यापीठ स्कुल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे माजी विद्यार्थी गायक हरिदास शिंदे आणि सहकाऱ्यांनी गण,गवळण,भारूड ,भेदिक,भजन ,गोंधळ,जागरण सादर केले.हा कार्यक्रम रविवार, २५ जून २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे पार पडला.
हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १६९ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले
.प्रास्ताविक भारती विद्यापीठ स्कुल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक शारंगधर साठे यांनी केले.सूत्रसंचालन लीना केतकर यांनी केले.पांडुरंग शिंदे, शेखर दरोडे,निखील गाडे,अक्षय बेत्रे,सारंग गवळी, राजू फासगे ,दर्शन जाधव सहभागी झाले.”
हे गजवदना, ये रणसदना, नाचत यावे अंगणा” ही शिंदे यांनी स्वरचित गण प्रथम सादर केला. त्या नंतर मौखिक परंपरेतील गवळण “या या गोविंदाने मन मोहिले” ही विठाबाई नारायणगावकर यांनी संगीतबद्ध केलेली गवळण सादर केली
. ‘सत्वर पाव गे मला भवानी, आई रोडगा वाहील तुला ‘ या पारंपरिक भारूड सादरीकरणालाही रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्या नंतर छत्रपती संभाजीराजां वरील “तुळापुरी कैद झाला वीर” हा पोवाडा शाहिर शिंदे यांनी अगदी जोशपूर्ण सादर केला. हा शाहिर पिराजी सरनाईक यांचा पोवाडा आहे
.भेदिक भजना मध्ये कबिराचे “इस तन धनकी कौन बढाई” हे भजनही तितक्याच ताकदीने आणि आध्यात्मिक तत्वज्ञानाचा परामर्ष घेत सादर करण्यात आले, त्यालाही उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.