भगीरथ भालके यांना विधानसभेला संधी दिली ही निवड चुकीची – शरद पवार 

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. यबाबात बोलताना शरद पवार म्हणाले, एखादी व्यक्ती गेली तर फार चिंता करायची गरज नसते. भालके यांना आम्ही ज्या वेळेला विधानसभेला संधी दिली त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं होतं की आमची ही निवड चुकीची होती. त्यांच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

शेजारच्या राज्याचे मुख्यमंत्री इथे आले दर्शनासाठी त्यावर हरकत घ्यायचं काही कारण नाही. परंतु, त्याशिवाय जे काही जबरदस्त ताकद दाखवण्याचा प्रयत्न शेकडो गाड्या आणि बाकीच्या इतर गोष्टी हे चिंताग्रस्त, वादग्रस्त आहे, असेही शरद पवार म्हणाले आहेत.

भाजपच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांना लक्ष्य केलं राष्ट्रवादी काँग्रेसनं तब्बल ७० हजार कोटींचा घोटाळा केला आहे. बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, बेकायदा खणन घोटाळा ही यादी मोठी आहे, असे मोदींनी म्हंटले होते. पंतप्रधान मोदींच्या या टीकेला आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

विरोधी पक्षाचे लोक देशाच्या समस्येबाबत चर्चा करतात ही गोष्ट काही लोकांना पटत नाही त्यामुळे अशा पद्धतीचे विधाने केली जातात, असा टोला शरद पवारांनी मोदींना लगावला आहे.पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे.

शिखर बँकेचा त्यांनी उल्लेख केला परंतु, मी कधी त्याचा सदस्य नव्हतो. कर्ज कधी मी घेतले नव्हते. याबाबत बोलणे कितपत ठीक आहे? सिंचनाबाबत त्यांनी वक्तव्य केलं मात्र ते खरे नाही. मोदींनी उल्लेख केलेलं शिखर बँक प्रकरण न्यायालयात गेले आहे त्यात माझा शिखर बँकेसोबत काही संबंध नाही हे स्पष्ट झालेले आहे, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे.

तर, मोठ्या प्रमाणावर देशातील विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात देशाच्या समस्येबाबत चर्चा करतात ही गोष्ट काही लोकांना पटत नाही त्यामुळे अशा पद्धतीचे विधाने केली जातात. यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही, असा टोलाही त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे

Latest News