2024 निवडणुकीत काय निकाल लागेल याची खात्री नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पदाला शोभणार नाही अशी वक्तव्ये करू लागले….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – शरद पवार म्हणाले की, सगळ्या राज्यातील चित्र हेच स्पष्ट करतं की, भाजपा त्यांची सत्ता असलेली राज्ये संभाळू शकली नाही आणि बहुतांश राज्ये त्यांच्या हातात नाहीत. अशा परिस्थितीत उद्या देशाच्या निवडणुकीत काय निकाल लागेल याची खात्री नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पदाला शोभणार नाही अशी वक्तव्ये करू लागले आहेत.शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या पक्षाविषयी मत व्यक्त केले. ते मत व्यक्त करताना त्यांनी मुलीला प्रोत्साहन द्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या असं म्हटले आहे. ते अगदी खरं आहे, माझी मुलगी स्वतःच्या कर्तुत्वावर तीनवेळा संसदेत निवडून गेली आहे. एखाद्यावेळी बापजाद्यांची पुण्याई उपयोगी पडते, पण दुसऱ्या, तिसऱ्या निवडणुकीत ही पुण्याई उपयोगी पडत नाही, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.शरद पवार पुढे म्हणाले, संसदेतील कामगिरीत सुप्रिया सुळेंनी 98-99 टक्के हजेरी लावली आणि अधिकाधिक सहभाग नोंदवला. त्यात त्यांचा पहिला क्रमांक आहे, संसदेच्या कामाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने सुप्रिया सुळेंना आठ वेळा पुरस्कार दिला. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी काहीही सांगितलं तरी स्व: कर्तुत्व असल्याशिवाय या देशातील मतदार नेहमी मत देत नाही. एखाद्यावेळी मत देऊ शकतात, ज्याच आईवडीलांची पुण्याची उपयुक्त ठरू शकते.मोदींनी असं वक्तव्य करणं अशोभनीय आहे. संसदेच्या सदस्याविषयी पंतप्रधानांनी असं मत व्यक्त करणं योग्य नाही. कारण या संस्था आहेत. मी पंतप्रधानांवर व्यक्तिगत टीका करत नाही, कारण ती संस्था आहे. संस्थांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. अशावेळी संसदीय सदस्य ही देखील संस्था आहे, हे लक्षात घेऊन सन्मान ठेवला पाहिजे.

Latest News