आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ‘रिपाइं’ला एक मंत्रिपद देण्याची मागणी….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

आगामी विधानसभा निवडणुकीविषयी ते म्हणाले, “जागा वाटपात विधान परिषदेची एक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीत ‘रिपाइं’ला योग्य वाटा मागितला आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षण रोटेशन पद्धतीने होत आहे. मात्र, या रोटेशन पद्धतीमुळे दलित वस्ती नसलेल्या गावांमध्ये मागासवर्गीय व्यक्ती निवडून येत नाही. यासाठी आरक्षण निश्‍चितीची रोटेशन बंद करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर मित्र पक्षांची मुंबईत नुकतीच बैठक झाली आहे. या बैठकीत आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ‘रिपाइं’ला एक मंत्रिपद देण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (ता.२९) पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.पाटण्यात विरोधकांची बैठक नुकतीच झाली. याबाबत रामदास आठवले म्हणाले, “देशातील विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकवटले आहेत. मात्र, त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय मराठा आरक्षणाला ‘रिपाइं’चा विरोध नाही. मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना स्वतंत्र आरक्षण त्यांना द्यावे, असे आमचे म्हणणे आहे.’ तेलंगणातील भारत राष्ट्र समिती पक्षानं महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. याविषयी रामदास आठवले म्हणाले, “राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार दमदार आहे. महाराष्ट्रात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांचा गुलाबी रंग चालणार नाही.

Latest News