PCMC: नवीन वीजजोडणी देण्यासाठी महावितरणकडून वेगाने कार्यवाही सुरू असून भोसरी गाव येथील शाखा कार्यालयामध्ये विशेष मदत कक्ष सुरु…

mahavitaran

PCMC: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

महावितरणकडे मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध असून पीएमआरडीच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सर्वच सुमारे ३ हजार १०० घरांना नवीन वीजमीटर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत नवीन वीजजोडणीचे १९१९ अर्ज प्राप्त झाले असून १५०९ ग्राहकांना कोटेशन देण्यात आले आहे. यात कोटेशनचा भरणा केलेल्या १३६७ ग्राहकांकडे नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्यांना ऑनलाइन अर्ज भरता येत नाही त्या लाभार्थ्यांनी घराचे ताबापत्र (अलॉटमेंट लेटर), ताबापत्रावरील व्यक्तीचे आधारकार्ड आदी आवश्यक कागदपत्रांसह भोसरी गाव शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.भोसरी गाव येथील शाखा कार्यालयात नवीन वीजजोडणीच्या कामासाठी ग्राहक सुविधा केंद्राचे आणखी दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांना वीजजोडणीसाठी ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल, त्यांनी केवळ आवश्यक कागदपत्रांसह भोसरी गाव शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा. या ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांची तपासणी करून त्याची पूर्तता करून घेणे, कोटेशन देणे व त्याचा भरणा केल्यानंतर क्रमवारीनुसार नवीन मीटर उपलब्ध करून वीजजोडणी कार्यान्वित करणे आदी कार्यवाही करण्यात येत आहे.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणकडून (पीएमआरडीए)जाधववाडी, सेक्टर १२ येथील प्रकल्पात लाभार्थ्यांना परवडणाऱ्या घरांचा ताबा देण्यात आला आहे. या लाभार्थ्यांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी महावितरणकडून वेगाने कार्यवाही सुरू असून भोसरी गाव येथील शाखा कार्यालयामध्ये विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.त्यामुळे कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीने वीजजोडणीचे आमिष दाखवून आर्थिक मागणी केल्यास त्यास लाभार्थ्यांनी कोणताही प्रतिसाद देऊ नये. तसेच नवीन वीजजोडणीच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास शाखा अभियंता, भोसरी गाव व अतिरिक्त कार्यकारी अभियंता, भोसरी उपविभाग यांच्याशी थेट संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Latest News