भिडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी देशात राहू नये…

दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादनासाठी बीड (Beed News) शहरात आलेल्या आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रिपाइं प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे सोबत होते. यावेळी संभाजी भिडेंवर त्यांनी घणाघाती टीका केलीसंभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचं आता वय झालं आहे. त्यांच्याकडे लक्ष देवू नये. भिड्यांच्या विरोधात महाराष्ट्र आहे. संभाजी भिडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी देशात राहू नये,’ अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी संभाजी भिडेंचा समाचार घेतलानुकतेच संभाजी भिडे यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाबाबत आणि भारतीय स्वातंत्र्यदिनाबाबत केलेल्या अतिशय वादग्रस्त विधानांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या आठवले यांना प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना आठवले म्हणाले की, “ज्यांना देशाचं संविधानच मान्य नाही, त्यांनी देशात राहू नये.

Latest News