राष्ट्रवादीकडून बंडखोर आमदारांवर कारवाई सुरू, तर दुसरीकडे अजित पवार गटा ची कारवाईला सुरुवात

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी भाजप-शिवसेना सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या या आमदारांवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादीने पहिलं पाऊल उचललं आहे. या 9 जणांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, असं पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनीही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून शरद पवार यांना पत्र पाठवलं आहे.सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असं सुप्रिया सुळे यांनी या पत्रात नमुद केलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या या पत्रानंतर शरद पवारांनी लगेचच तटकरे आणि पटेल यांच्यावर कारवाई केली आहे. प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश देत आहे, असं ट्वीट शरद पवारांनी केलं आहे.काल काही नियुक्ती केली आहे. मागच्या अधिवेशन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. सप्टेंबरमध्ये दिल्लीत अधिवेशनमध्ये कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष होतो. पक्षातील सर्व नियुक्त्या माझ्या सहीने झाली होती.संघटना निवडणूक न करता जयंत पाटील यांना तात्पुरती प्रदेशा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आता जयंत पाटील यांना या जबाबदारीतून मुक्त करतो. त्यांच्या जागी सुनिल तटकरे यांना प्रदेश अध्यक्ष करतो, आतापासून सर्व कामे पाहतील. जयंत पाटील यांना असे सूचित केले आहे, अशी घोषणाच पटेल यांनी केली.अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा केल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे राष्ट्रवादीकडून 9 बंडखोर आमदारांवर कारवाई सुरू झाली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटानेही कारवाईला सुरुवात केली आहे.प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची घोषणा केली आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. ‘अजित पवार यांच्या अध्क्षतेखाली आम्ही सरकारमध्ये सामील झालो. आज काही संघटनात्मक बदल करण्यात आले आहे.संघटनेमधील बदल करण्याबाबत सर्व अधिकार सुनील तटकरे यांना राहतील. कुठलाही निलंबनाची प्रक्रिया एका व्यक्तीकडे नाही. विधानसभा अध्यक्षांकडे आहे.अजित पवार यांना सर्व आमदारांना पक्षाचा विधिमंडळ नेता नियुक्ती केला आहे. अनिल भाईदास पाटील यांना प्रतोद करण्याची माहिती अध्यक्षांकडे दिली आहे, असंही पटेल यांनी सांगितलं.

Latest News