Pune: NCP पुणे शहर संकटसमयी शरद पवारासोबत – पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पाडणाऱ्या भाजप आणि राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच पक्षावर ओढवल्यावर संकटसमयी आपण राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठिशी राहण्याचा ठराव एकमताने शहर कार्यकारणीत संमत करण्यात आला. आपण अशावेळी शरद पवारासोबत उभे राहू, असे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहेअजित पवारांच्या पक्षातील या बंडानंतर शरद पवार (Sharad Pawar News) आता मैदानात उतरले आहेत. लवकरच शरद पवार हे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. महाराष्ट्र दौरा करून, पुन्हा एकदा पक्षबांधणी करणार असल्याचे शरद पवारांनी घोषणा केली. पक्षातल्या या सर्व घडामोडींवर आता पुणे शहर कार्यकारणीने पुण्यात बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये पुणे शहर राष्ट्रवादीने कोणत्या गटात जायचं? याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेराज्यातील राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP News) नेते आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या धक्कातंत्रामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहेत. अजित पवार आपल्या काही समर्थक आमदारांसह राजभवनावर दाखले होऊन, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सोबतच आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा करत, युती सरकारमध्ये सामील झाले. प्रदेश कार्यकारणीची बैठक मुंबई येथे ५ जुलै रोजी होणार आहे. या बैठकीला आपण उपस्थित होणार राहणार असे जगताप यांनी स्पष्ट केले. अशावेळी पुणे शहर राष्ट्रवादीयांच्याच पाठीशी आहे, हे दाखवून दिले जाईल, असेही प्रशांत जगताप म्हणाले. आपण कायदेशीर लढाईसाठीही तयारी करत आहोत, त्यामुळे प्रतिज्ञापत्रांचीही तयारी केली आहे. प्रतिज्ञापत्रच घेऊन आपण मुंबईत दाखल होणार आहोत

Latest News