नाराज होऊन आता काय करणार. जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारली पाहिजे- शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं की, नाराज होऊन आता काय करणार. जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारली पाहिजे. थोडी नाराजी राहणारच. कारण ज्याला एक भाकरी खायची होती त्याला आर्धीच मिळाली. ज्याला आर्धी खायची त्याला पाव मिळाली. तरीही आम्ही खूश आहोतयेत्या 8 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल. मी आता तरी मंत्रिमंडळात दिसायला पाहिजे. मी पहिल्या लिस्टमध्ये होतो, आता होईल, असंही भरत गोगावले यांनी म्हटलं.राष्ट्रवादी आमच्यासोबत आली याचं स्वागत आहे. भाजप-शिवसेनेच्या विचारांसोबत सहमत असल्याचा आनंद आहे. राष्ट्रवादी आमच्यासोबत आली किंवा दुसरं कुणीही आलं तरी सत्तेचं विकेंद्रीकरण होतं. त्यामुळे सगळं सोडायचं असेल तर सत्ता कशासाठी? असं म्हणत संजय शिरसाट यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अजित पवार यांना बंडखोरी करत अनेक आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकार पाठिंबा दिला. 2 जुलै रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर 8 आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेतली.मात्र अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. मात्र आता शिंदे गटाने आमदार, मंत्री उघडपणे नाराजी व्यक्त करु लागले आहे.भाजप-शिवसेना-अजित पवार गट युती सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे व राष्ट्रवादीत खटके उडाले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेत मोठा वाटा मिळणार हे स्पष्ट होत असताना शिंदे गटाकडून याला विरोध होताना दिसत आहे. पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांना स्वीकारणार नाही, अशी भूमिका रायगडच्या कर्जतमधील आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे.

Latest News