राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षातील सर्व आमदारांना व्हीप जारी, पक्षाची बैठक…..


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षातील सर्व आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. उद्या पक्षाची बैठक होत आहे. बैठकीला सर्व आमदारांनी उपस्थित राहावे असा पक्ष आदेश काढण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत पत्र जारी केलं आहे.
राष्ट्रवादीतील काही आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार यांना पक्ष आपल्यासोबत असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेच असल्याचा दावा केला जात आहे.
बुधवार, ५ जुलै, २०२३ रोजी दुपारी १ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे महाराष्ट्र विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व विधान सभा सदस्यांची बैठक आयोजित केली आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधीमंडळाच्या सर्व विधानसभा सदस्यांनी अवश्य उपस्थित रहावे, असा पक्षादेश आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात कार्याध्यक्ष हे पद नाममात्र आहे.
शरद पवार यांना कॅन्सर झाला असताना तारिक अन्वर यांनी २००६ साली केलेल्या पक्षाच्या घटनेत अशी स्पष्ट तरतूद केली आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीत राष्ट्रीय अध्यक्षाकडे सगळे अधिकार आहेत आणि कार्याध्यक्ष हे पद नाममात्र आहे. पक्षाचे कोणत्याही नेमणुकीचे अधिकार फक्त राष्ट्रीय अध्यक्षांनाच आहेत. त्यामुळे कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेले निर्णय आणि नेमणूक यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे
.विधानपरिषदेच्या आमदारांसाठी शशिकांत शिंदे यांनी व्हीप जारी केला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरला होणाऱ्या बैठकीसाठी सगळ्यांनी उपस्थित राहण्याचा व्हीप जारी केला आहे. विधानपरिषदेचे एकूण आमदारांपैकी अजित पवारांसोबत 5 आमदार तर शरद पवारांसोबत 4 आमदार आहेत.राष्ट्रवादीच्या बैठकीला उद्या कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र जे आमदार उद्या उपस्थित राहणार नाही, त्यांच्यावर पक्षाकडून केली जाऊ शकते