विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक आनंदराव कंग्राळकर यांचा सत्कार…


पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
न्यू इंग्लीश स्कूलचे राष्ट्रीय पारितोषिक विजेते विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक आनंदराव कंग्राळकर यांना गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरू वंदन करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे १९७१ च्या बॅचचे विद्यार्थी बी.एस. जाधव यांनी स्वलिखित तीन पुस्तके भेट दिली. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.श्री. कंग्राळकर हे ९२ वर्षाचे असून गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर त्यांच्या घरीच हा छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला. कंग्राळकर यांना राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त झाले त्यावेळी कंग्राळकर यांची करंडी गावात बैलजोड्या , ११ बैलगाड्यातून मिरवणूक काढण्यात आली होती. या सर्व आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी चंद्रकांत जाधव,कंग्राळकर कुटुंबीय उपस्थित होते