NCP पुणे शहराध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड…


pune: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘पुणे शहराध्यक्ष’ पदी निवड केल्याबद्दल आमचे नेते उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सुनिलजी तटकरे यांचे मनःपूर्वक धन्यवाद ! पक्षाने दिलेल्या या संधीबद्दल आणि माझ्याप्रती दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत असेल. पक्षाने दिलेली ही जबाबदारी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल.अजित पवार यांनी ncp पक्षावर दावा केल्यानंतर आता नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचे काम जोरात सुरु आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी तर rupali chakankar यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आज दीपक मानकर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा गट भाजपसोबत सत्तेत सामिल झाल्याने राष्ट्रवादीमध्येही फूट पडली. यानंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्हावरच दावा केला. त्यामुळे राष्ट्रवादीत जोरदार हालचाली वाढल्या आहेत.अजित पवारांनी आपल्याबरोबरच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा करत राज्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकी करण्याबाबत हालचालीही सुरू केल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र यांनी त्यांना दिले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीपक मानकर यांचे अभिनंदन केउपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे अॅक्शन मो़डवर आले आहेत. अजित पवार यांच्याकडून दीपक मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यापदी निवड करण्यात आली आहे