मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. दुसऱ्या कुणी काय म्हटले? त्याला काही अर्थ नाही- शरद पवार


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – आज जे सत्तेत आहे त्यांना लोक दूर करतील. राज्यातील विरोधी पक्षांविरोधात ज्या प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या त्याची जोरदार किंमत मोजावी लागेल, असे यांनी म्हटले. जे महाराष्ट्रात सुरू आहे त्याबाबत मला आनंद आहे. याची मोठी किंमत मतदारांना आश्वासन देऊन चुकीच्या मार्गावर गेलेल्यांना मोजावी लागणारराज्यातील सत्तेत बदल होतील. जनता राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची यांच्या हातात सत्ता देईल, असेही पवारांनी सांगितले. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. दुसऱ्या कुणी काय म्हटले? त्याला काही अर्थ नाही आहे. कोण काय म्हणते त्याच्याशी काही करायचे नाही. आजही जी कार्यकारिणी झाली, ती माझ्या अध्यक्षतेखाली झाली असे पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज महत्त्वाची बैठक झाली. या वेळी दोन खासदार आणि नऊ आमदारांचे निलंबन करण्यात आले. यामध्ये खासदारांमध्ये प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश आहे. याशिवाय एस. आर. कोलहली यांचेही निलंबन करण्यात आले. या बैठकीत राष्ट्रवादीच्या समितीने एकूण आठ ठराव मंजूर केले. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, पक्षाचे पुढील धोरण काय असावे, कुणाबरोबर युती करावी यावर चर्चा झाली. पवार म्हणाले, मला पूर्ण विश्वास आहे, २०१४ मध्ये महाराष्ट्रात सत्ता बदलेल