ना टायर्ड हूँ.. ना रिटायर्ड हूँ.. मैं तो फायर हूँ! – शरद पवार

नाशिक (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – वयाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी भाष्य केलं. स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचं वाक्य उच्चारत शरद पवार म्हणाले की, ना टायर्ड हूँ.. ना रिटायर्ड हूँ.. मैं तो फायर हूँ! असं म्हणून पवारांनी विरोधकांना सणसणीत चपराक दिली आहे
शरद पवार पुढे म्हणाले की, १९८० साली मी जेव्हा काँग्रेस मधून बाहेर पडलो त्यावेळी नाशिक जिल्ह्याने आम्हांला जागा निवडून दिल्या.त्यावेळी लागोपाठ येवल्यातून जागा निवडून आल्या. आता नाशिकच्या सहकाऱ्यांनी छगन भुजबळ यांनी येवल्यातून लढावं हे सुचवलं होतं.
भुजबळांना सेफ जागा द्यायची होती म्हणून येवल्याची जागा निवडली आणि तिथे आम्हाला यश आलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्यभर दौरे करण्याचा संकल्प केला आहे. त्याची सुरुवात आज नाशिकमधून करण्यात आला आहे. यावेळी पवारांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांना हात घातला.
दौऱ्याची सुरुवात नाशिकमधूनच का केली असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावेळी पवार म्हणाले की, स्वातंत्र्याच्या इतिहासात नाशिक आघाडीवर होतं. काँग्रेस पक्षाच्या इतिहासात नाशिकला अधिवेशन झालं, हे विसरुन चालणार नाही. शिवाय अनेक नेते या शहरातून घडल्याचं त्यांनी नमूद केलं
अजित पवारांनी उपस्थित केलेल्या हे
वयाबद्दल बोलतांना पवार म्हणाले की, यापूर्वी अनेकांनी जोमानं मंत्रिमंडळात काम केलेलं आहे. आमच्यासोबत मोरारार्जी देसाई अत्यंत जोमाने काम करायचे. तेव्हा त्यांचं वय ८४ होतं. ते देशाचं किती काम करतात, याची याची चर्चा देशभरात व्हायची. त्यामुळे वयाचा काहीही मुद्दा नसल्याचं पवार म्हणाले.