नेत्रतज्ज्ञांच्या चेन्नई परिषदेमध्ये डॉ. श्रीकांत केळकर यांचा सहभाग

*नेत्रतज्ज्ञांच्या चेन्नई परिषदेमध्ये डॉ. श्रीकांत केळकर यांचा सहभाग*

पुणे देशभरातील नेत्रतज्ज्ञांच्या चेन्नई येथे झालेल्या ‘इंडियन इंट्राऑक्युलर इम्प्लांट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी कन्व्हेंशन -२०२३’ या राष्ट्रीय परिषदेमध्ये पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफथाल्मोलॉजी चे संस्थापक आणि ज्येष्ठ नेत्रशल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत केळकर सहभागी झाले.

इंडियन इंट्राऑक्युलर इम्प्लांट अँड रिफ्रॅक्टिव्ह सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने ८ आणि ९ जुलै रोजी ही परिषद आयटीसी ग्रॅंड चोला(चेन्नई) येथे आयोजित करण्यात आली. पहिल्या दिवशी या परिषदेमध्ये दोन चर्चासत्रांचे उपाध्यक्षपद केळकर यांनी भूषवले, तसेच संशोधनपर शोधनिबंध ही सादर केला. देशभरातून ४०० तज्ज्ञ उपस्थित होते

Latest News