प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन

पुणे– ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

80 च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाजनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले, या एव्हरग्रीन अभिनेत्याच्या करिअरची सुरुवात टॅक्सी चालवण्यापासून झाली होती. अभिनेता रविंद्र महाजनी हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते.

अभिनय क्षेत्रात पाय ठेवण्यापूर्वी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत. त्यांनी साधारणपणे 3 वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. मात्र, त्यांच्यातील एक कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत आणि रात्री टॅक्सी चालवत.

रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केले. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यांसारखे प्रसिद्ध चित्रपट दिले.

एवढेच नाही, तर ते बॉलिवूडमध्येही झळकले. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.मराठी सिनेसृष्टीवर आघात करणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन झालं आहे.

80 चा काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे रविंद्र महाजनी त्याकाळी मराठीतील हँडसम हंक म्हणून रविंद्र महाजनी यांच्याकडे पाहिलं जायचं.आज ते आपल्यात नाहीत, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाही.

मावळच्या तळेगाव दाभाडे येथील घरात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. रवींद्र यांचं वय 77 वर्ष होतं. त्यांचा मृत्यू साधारण: तीन दिवसांपूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.

लोकप्रिय अभिनेत्याचा असा शेवट झाला आहे.तळेगाव MIDC पो स्टे हद्दीत एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे मराठी सिने अभिनेता रवींद्र हनुमंत महाजनी (वय 77 वर्षे) बंद फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळून आले आहेत.

ते गेले 7- 8 महिन्यापासून वरील ठिकाणी एकटेच राहण्यास होते. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा गश्मिर यांना कळविण्यात आली असून ते तळेगाव येथे आल्यानंतर मृतदेहाचे पोस्ट मोर्टेम करून घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

Latest News