अनुभव ‘ नृत्य सादरीकरणाला चांगला प्रतिसाद– ‘भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

IMG-20230716-WA0076

अनुभव ‘ नृत्य सादरीकरणाला चांगला प्रतिसाद– ‘*भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम*

पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘ अनुभव ‘ या नृत्य कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. नृत्यांजली डान्स ऍकॅडमीच्या विद्यार्थिनी शिष्या सहभागी झाल्या. हा कार्यक्रम शनीवार, १५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे उत्साहात पार पडला.गणेश वंदनेने प्रारंभ झाला

.पुष्पांजली,आलारीपू,जतीस्वर,शब्द,कीर्तन, तिल्लाना नृत्यप्रकारांनी चांगला प्रतिसाद मिळाला.भरतनाट्यम,लोकनृत्य,संथाल,कुमी,लंबाडी,बिहू,भांगडा,गरबा नृत्यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. हा कार्यक्रम विनामूल्य होता.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १७२ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले

Latest News