लक्ष्य ‘ नृत्य सादरीकरणाला चांगला प्रतिसाद भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम


पुणे ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘ लक्ष्य’ या नृत्य सादरीकरणाच्या कार्यक्रमाला शनीवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेतर्फे हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला.कथक,सत्रीय,ओडिसी या ३ नृत्य शैलीचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. प्रेरणा देशपांडे,प्रतिशा सुरेश,प्रचीती डांगे सहभागी झाल्या , त्यांच्या नृत्याला उपस्थित रसिकांनी दाद दिली.
हा कार्यक्रम शनीवार,२९ जुलै २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे पार पडला.
हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १७४ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.डॉ. सुचेता भिडे- चापेकर, रसिका गुमास्ते यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.