जीविधा’ संस्था आयोजित १३ व्या हिरवाई महोत्सवास आज प्रारंभ


‘जीविधा’ संस्था आयोजित १३ व्या हिरवाई महोत्सवास आज प्रारंभ
पुणे :’जीविधा’ संस्था आयोजित १३ व्या हिरवाई महोत्सवास आज(३ ऑगस्ट २०२३) रोजी प्रारंभ होत आहे. जीविधा चे संस्थापक राजीव पंडित यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 3 ते 5 ऑगस्ट 2023 दरम्यान रोज सायंकाळी 6.30 पर्यावरण विषयक विविध व्याख्यानांचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे
.इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, पुणे मनपा राजेंद्रनगर, सचिन तेंडुलकर जाॅगिंग पार्क समोर, म्हात्रे पुलाजवळ हा महोत्सव होणार आहे.देशी वनस्पतींच्या लागवडीच्या कामात सर्वसामान्य लोकांचा सहभाग वाढावा यासाठी गेली 12 वर्षे हा उपक्रम जीविधा आयोजित करते.
या वर्षीच्या हिरवाई महोत्सवातून ‘बांबू’ या वनस्पतीच्या माहिती आणि जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. बांबूचा औद्योगिक वापर, त्याचे आर्थिक गणित आणि देशात बांबू क्रांती आणण्यासाठीचे उपाय यावर प्रकाश टाकणारी दोन व्याख्याने असतील. या महोत्सवाची सांगता दरवर्षी प्रमाणे महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे.
गुरुवार, 3 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी ६.३० वाजता महोत्सवाचे उदघाटन होणार असून ‘ बांबूची अनोखी दुनिया’ अभ्यासक डॉ. हेमंत बेडेकर यांचे व्याख्यान होणार आहे.शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023′ बांबू आणि पर्यावरण’ या विषयावर डॉ हेमंत बेडेकर मार्गदर्शन करणार आहेत
. बांबूचे पर्यावरणातील स्थान, पाऊस,वारा, माती आणि पाणी संवर्धन, बांबू आणि पाणी शुद्धीकरण, बांबू उद्यान आणि आपले स्वास्थ्य, बांबू आणि प्राणवायू, नदीकाठ आणि बांबू या विषयाची चर्चा होणार आहे . शनिवार , 5 ऑगस्ट 2023 रोजी महाकवी कालिदास रचित कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज अनुवादित ‘संगीत मेघदूत’ विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
संहिता लेखन – डॉ.मंदार दातार यांचे असून संगीत अमोल अशोक काळे यांचे आहे. गायन – अमोल काळे व स्वामिनी कुलकर्णी , तबला – श्री महेश कुलकर्णी, तबला, डफ, घटम, खंजिरी – रुद्र जोगळेकर, तालवाद्याची साथ – ओवी काळे, मोहिनी कुलकर्णी, यक्ष वाचन – गौरव बर्वे, सिंथेसायझर- स्वामिनी कुलकर्णी हे साथसंगत करणार आहेत.