पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तार प्रस्तावाला मान्यता द्यावी- खासदार श्रीरंग बारणे


पिंपरी-चिंचवडकरांच्या दृष्टीने ती अर्धवटच आहे. कारण त्यातून फक्त निम्मे शहर कव्हर झाले. मेट्रो शहराच्या दुसऱ्या टोकापर्यंत निगडी येथे जाणे गरजेचे असून तशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलेली आहे.राज्य सरकारच्या या प्रस्तावाला येत्या सात दिवसांत मान्यता देऊ, असे आश्वासन केंद्रीय शहरी विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरवारी दिले.
राज्य शासनाच्या पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तार प्रस्तावाला मान्यता द्यावी, यासाठी हरदीपसिंग यांची नवी दिल्लीत भेट घेतली. तेव्हा त्यांनी वरील आश्वासन दिल्याचे शहराचे (मावळ) खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
आकुर्डी,आणि निगडी परिसरातील नागरिकांची निगडीपर्यंत मेट्रो सुरु करण्याची मागणी होती 25 फेब्रुवारी 2022 रोजी गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाला 910.18 कोटी रुपयांच्या खर्चाचा सुधारित तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्यात आलेला आहे पिंपरी ते शिवाजीनगर, पुणे अशी मेट्रो नुकतीच धावली.
त्यामुळे पिंपरी ते निगडीच्या भक्तीशक्ती चौकापर्यंतचा मेट्रोच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.या खर्चात केंद्र सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सम प्रमाणात वाटा असेल. 4.13 किमी लांबीचा हा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तो आवश्यक असल्याने त्याला तत्काळ मान्यता देण्याची विनंती खासदार बारणेंनी पुरी यांना केली. त्यावर येत्या सात दिवसांत मान्यता देण्याचे आश्वासन पुरी यांनी दिले. त्यामुळे निगडीपर्यंतचे पिंपरी-चिंचवडकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार…