संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल….


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हे शिवाजी महाराजांवर वार करणाऱ्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचे वंशज असल्याचा संशय त्यांच्या वर्तनावरून येत आहे. ते मनोरुग्ण आणि विकृत आहेत, अशी टीका डॉ.कुमार सप्तर्षी यांनी केली होती.
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त असून त्यांनीही भिडेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केलाय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी भिडेंच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करुन काँग्रेससह काही संघटनांकडून त्यांचा निषेध केला जात आहेत. संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. भिडेंविरुध्द पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या आहेत.
भिडेंच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार , असे कुमार सप्तर्षी यांनी आठ दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले असून त्यांची विचारसरणी संपविण्याचे कटकारस्थान सुरू आहे. या मागे देवेंद्र फडणवीस आणि संघ आहे
.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंगली पेटविण्याची तयारी सुरू असून वादग्रस्त वक्तव्ये करून वातावरण खराब केले जात आहे, असा आरोप डॉ. सप्तर्षी यांनी केला आहे.काही दिवसांपूर्वी यांनी महात्मा फुले यांच्याबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. होते महात्मा गांधी हे राष्ट्रपिता म्हणून आदरणीयया प्रकारामुळे महात्मा फुले यांचे अनुयायी आक्रमक झाले होते. त्यामुळे शेकडो अनुयायांनी भिडेंविरुध्द तक्रार देऊन त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.