मोहिनीअट्टम नृत्य सादरीकरणाला चांगला प्रतिसाद — भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम


मोहिनीअट्टम नृत्य सादरीकरणाला चांगला प्रतिसाद — भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘ लास्य’ या मोहिनीअट्टम नृत्य सादरीकरणाला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. दिल्ली विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ.दीप्ती भल्ला यांनी या कार्यक्रमात प्रभावी नृत्य सादरीकरण केले. मोहिनीआट्टम मधील स्त्रीसुलभ लालित्याचे हे सौंदर्यपूर्ण सादरीकरण उपस्थित रसिकांना मोहून गेले.हा कार्यक्रम रविवार,६ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला. हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १७५ वा कार्यक्रम होता.