आझादी का अमृत महोत्सवानिमित्त” क्रांतिकारकांचे बलिदान उजागर करण्यासाठी शहरात विविध उपक्रमांचे आयोजन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची माहिती

IMG-20230809-WA0021

*”आझादी का अमृत महोत्सवानिमित्त” क्रांतिकारकांचे बलिदान उजागर करण्यासाठी शहरात विविध उपक्रमांचे आयोजन**भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांची माहिती*

पिंपरी,: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिकारकांच्या बलिदानाचे उजागर करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर भाजपा शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगत प्रकाश नड्डा यांच्या आदेशानुसार ०९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान “आझादी का अमृत महोत्सव समापण अभियान कार्यक्रम” संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यात राबविला जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मा. शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड किवळे मंडलाची बैठक उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये, “हर घर तिरंगा”, “विभाजन विभिषिका दिन” आणि “मेरी माती मेरा देश” या कार्यक्रमासाठी प्रभाग निहाय संयोजक यांची नेमणूक करून कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली.

यामध्ये, प्रभाग सदस्य बिभीषण चौधरी यांची (“हर घर तिरंगा”), नगरसेवक राजेंद्र गावडे (मेरी माती मेरा देश), पूर्व उपमहापौर सचिन दादा चिंचवडे (विभाजन विभिषीका दिन) यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी, भाजपा चिंचवड विधानसभा प्रमुख काळूराम बारणे, सत्तारूढ पक्षनेता नामदेवराव ढाके, उपमहापौर सचिन (दादा) चिंचवडे, महिला मोर्चा शहराध्यक्ष उज्ज्वलाताई गावडे, भायुमो प्रदेश सचिव अजित कुलते, चिंचवड किवळे मंडलाध्यक्ष योगेश चिंचवडे, चिंचवड किवळे महिला मोर्चा मंडलाध्यक्ष पल्लवीताई वाल्हेकर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेवक राजेंद्र गावडे, अभिषेक बारणे आदी पदाधिकारी – कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

प्रसंगी, विभाजन विभिषिका दिन, हर घर तिरंगा, “मेरी माती मेरा देश” या उपक्रमासाठी प्रभाग निहाय संयोजकांची नेमणूक करण्यात आली. दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत “हर घर तिरंगा” हे अभियान शहरातील सर्व प्रभागांमध्ये आणि सर्व बूथ वर घरोघरी राबविले जाणार आहे. सामान्य नागरिकांना सुद्धा या अभियानात सहभागी करून घेतले जाणार आहे.

12 ऑगस्ट रोजी शिवाजी चौक वाल्हेकरवाडी ते चिंतामणी गणपती मंदिर असा क्रांतिकारकांचा जिवंत देखावा मिरवणूक काढण्यात येणार आहे.13 ऑगस्ट रोजी डांगे चौक – वाकड- पिंपळे निलख अशी तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे “मेरी मिट्टी मेरा देश” हा कार्यक्रम मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्याचे केंद्रीय नेतृत्वाने निश्चित केले आहे

. या कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक प्रभागात असणारे स्वतंत्र सेनानी सेंट्रल व राज्य पोलिस फोर्स, जे दिवंगत झालेले आहेत यांच्या नावे एक फलक किंवा शिला लावली जाणार आहे. तसेच शहरातील स्वतंत्रता सेनानी यांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

१४ ऑगस्ट विभाजन विभिषिक स्मृती दिवस या कार्यक्रम अंतर्गत देशाच्या फाळणीच्या वेळी ज्यांनी प्राण गमावले, त्या सर्वाना श्रद्धांजली वाहून १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून पाळला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्त चाफेकर वाडा ते चाफेकर चौक अशी मुक मिरवणूक काढून स्वतंत्र सेनानी यांच्या विषयी भाषणे केली जाणार आहेत.

प्रतिक्रिया…स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातीलप्रत्येक मंडलातील शाळा महाविद्यालय या स्वतंत्र सेनानी व फाळणीतिल कटू आठवणी यांच्या प्रदर्शनी लावल्या जाणार आहेत. अश्या पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रम ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हयाच्या वतीने राबविला जाणार आहे.*- शंकर भाऊ जगताप, भाजपा, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष.

Latest News