उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर विदर्भवादी कार्यकर्त्यांचे आंदोलन….


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर विदर्भवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने पोलिसांनी निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच काही आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात देखील घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानाबाहेर मोर्चा काढण्यात आला असून ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विदर्भवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अन्न धान्यावरील ‘जीएसटी’सह विविध मागण्यासंदर्भात विदर्भवादी आक्रमक झाले आहेत.वेगळ्या विदर्भ राज्याची आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
याबरोबरच विजदरात घट द्यावी, तसेच अन्न धान्यावरील जीएसटीच्या विरोधात विदर्भवादी कार्यकर्त्यांनी सुरवातीलाकाढला. मात्र, नंतर फडणवीसांच्याथील निवासस्थानाकडे आंदोलकांनी कूच केली. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीवेळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता
यानंतर पोलिसांनी यांच्या निवासस्थानाबाहेर बॅरिकेड्स लावत परिसरात मोठाबंदोबस्त तैनात केला. पण तरीही आंदोलकांनी फडणवीसांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न केला असता काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.