येणारा गणेशोत्सव चांगल्या व उत्साही वातावरणात पार पाडण्याचे आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केले- पुणे पोलिसांचे आवाहन….

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीमध्ये अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदिपसिंह गिल , पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त विशेष शाखा आर.राजा यांनी उपस्थित सर्व गणेश मंडळ आणि त्यांचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. मिटिंगच्या शेवटी पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपस्थितांना सूचना वजा मार्गदर्शन केले. येणारा गणेशोत्सव चांगल्या व उत्साही वातावरणात पार पाडण्याचे आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केले.आगामी गणेशोत्सव 2023 च्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली झोन-1 मधील सार्वजनिक गणेश मंडळ व पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती.टिळक रोड येथील दुर्वांकुर सभागृहात सायंकाळी 6 ते 9 या वेळेत गणेश मंडळांची व त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवा दरम्यान त्यांना येणाऱ्या अडचणी बाबत सूचना मांडल्या.या बैठकीला अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल,पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त विशेष शाखा आर.
राजा, सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग वसंत कुवर ,सहायक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अशोक धुमाळ ,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल तांबे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 सतिश गोवेकर, सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा मौला सैय्यद ,विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा , विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे दादासाहेब गायकवाड ,फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गुन्हे मंगेश जगताप तसेच विशेष शाखा व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी केले.

Latest News