कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने कोकणासाठी गणेशोत्सव निमित्त ज्यादा गाड्या सोडण्यासाठी वल्लभनगर आगार प्रमुखांना निवेदन…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – कोकणात अनेक उत्सव हे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात. या उत्सवांपैकी कोकणी माणुस खास आवर्जून आपल्या कोकणात जातो तो उत्सव म्हणजे गौरी -गणपती उत्सव होय.आणि आपल्या गावी जाण्यासाठी सर्व बस आगारामध्ये गर्दीच गर्दी असते. बससेवा कमी आणि प्रवासी संख्या जास्त असते. म्हणून कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने कोकणासाठी रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सव निमित्त ज्यादा गाड्या सोडण्यासाठी आज दि:-१२.०८.२३ वार शनिवार रोजी वल्लभनगर संत तुकाराम नगर पिंपरी (एस. टी. डेपो) आगार प्रमुख श्री.संजय वाळवे साहेब यांना निवेदन देण्यात आले. तसेच वल्लभनगर मधून रोज रात्री ११ वाजता सुटणारी गाडी पिंपरी चिंचवड -चोरवणे या बसच्या एकूण दुरावस्थे विषयीही निवेदन देण्यात आले. यासंबंधी श्री वाळवे साहेब व संबंधित खेड आगार प्रमुख यांची फोनवरुन चर्चा झाली व लवकरच नवीन बस देण्याचे आश्वासन देखील दिले आहे यावेळी निवेदन देताना संस्थेचे अध्यक्ष श्री.रुपेश मोरे,संदिप जाधव, सुरज उतेकर, संदिप साळुंखे, कैलास मोरे, अंकुर चव्हाण,अनिल कोकिरकर,महेश गोरे,रोहित पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.