मणिपूरचा प्रश्न मणिपूर पुरता मर्यादीत नाही तर चिंताजनक प्रश्न- शरद पवार 

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – काँग्रेस मणिपूरच्या प्रश्नांमध्ये राजकारण करीत आहे, असा आरोप सत्ताधारी करतात, मात्र तीस वर्षापूर्वी काय झाले यापेक्षा नऊ वर्षांपासून तुमच्याकडे सत्ता आहे, जर काहीही केले नसेल तर तुम्हाला सत्ता दिली होती, मग या नऊवर्षामध्ये तुम्ही काय केले हे मात्र ते सोयीस्कर विसरत आहेत.

मणिपूरचा प्रश्न मणिपूरपुरता मर्यादीत नाही. हा चिंताजनक प्रश्न आहे, सरकार याकडे लक्ष दिले पाहिजे,” असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व्यक्त केले

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शनिवारी पुण्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बाबत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली . “त्या गुप्त भेटीबाबत संभ्रम निर्माण करू नका,” असे पवारांनी सांगितले.

महाविकास आघाडीत कोणताही संभ्रम नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आघाडीत एकी आहे. कोणताही संभ्रम नाही. काल सोलापूरला असताना या सर्व गोष्टी आम्ही स्पष्ट केलेल्या आहेत, त्यामुळे पुन्हा पत्रकारांनी याबाबत संभ्रम वाढवण्याची गरज नाही,” असे ते म्हणाले.

मणिपूरसह ईशान्य भारताचा विकास तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी होऊ दिला नाही,असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या अधिवेशनात केला. मणिपूरच्या परिस्थितीचे खापर मोदींनी काँग्रेसवर फोडले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मणिपूर प्रश्नांवरून सरकारला रोखठोक सवाल केला. “

काँग्रेसच्या कार्यकाळात तीस वर्षापूर्वी काय घडलं हे आता कशाला सांगता ? नऊ वर्षात तुम्ही काय केले हे सांगा,” असा सवाल पवारांनी मोदी सरकारला केला. बारामतीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते

Latest News