ध्वजसन्मानाबाबत जनजागृतीसाठी शॉर्ट फिल्म !


ध्वजसन्मानाबाबत जनजागृतीसाठी शॉर्ट फिल्म !
पुणे :भारत फ्लॅग फाउंडेशन ने यंदा ध्वजसन्मानाबाबत जनजागृतीसाठी अत्यंत अभिनव मार्ग निवडून शॉर्ट फिल्म तयार केली आहे.’तो कोण होता ?’ (who was he ?) नावाची ही शॉर्ट फिल्म यु ट्यूब वर प्रदर्शित करण्यात आली आहे. https://youtube.com/watch?v=W6Pllgoc_D0&feature=share या लिंक वर ही शॉर्ट फिल्म उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राष्ट्र ध्वज पायदळी जाऊ देऊ नये असा संदेश या शॉर्ट फिल्म द्वारे दिला जात आहे.राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून या छोट्या फिल्म ची लिंक फॉरवर्ड करावी असे आवाहन फाउंडेशन ने केले आहे.
गिरीश मुरुडकर,अरविंद पांचाळ,अभिषेक राऊत,रत्ना येलमार ,वैभव महाले,दादा भंडारी,हेतल मोजिद्रा,मेघना फाळके,प्रमोद कुलकर्णी,शुभम चिंचोळे,वैभव पाध्ये,प्रज्ञा जोशी,समृद्धी मसुरकर,सीमंतिनी गीते,सुरज सोळसे यांचा शॉर्ट फिल्म मध्ये सहभाग आहे.भारत फ्लॅग फाउंडेशनच्या टीम ने त्यासाठी गेले २ महिने मेहनत घेतली,असे भारत फ्लॅग फाउंडेशनचे चे अध्यक्ष गिरीश मुरुडकर यांनी पत्रकाद्वारे सांगितले.