प्रा. हरी नरके यांच्या स्मरणार्थ विचार सभा–विचार पुढे नेण्याचा,’हरी नरके विचारपीठ’ स्थापनेचा संकल्प


*प्रा. हरी नरके यांच्या स्मरणार्थ विचार सभा—–*विचार पुढे नेण्याचा,’हरी नरके विचारपीठ’ स्थापनेचा संकल्प
*पुणे :जेष्ठ साहित्यिक, लेखक, पुरोगामी विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या स्मरणार्थ विविध संघटनामार्फत दादासाहेब दरोडे सभागृह डेक्कन, पुणे येथे श्रद्धांजली सभा झाली. हरी नरके यांच्या कार्याचा, विचारांचा, शिकवणीचा वारसा साहित्य, ऑडिओ बुक, व्याख्याने, प्रबोधन शिबिरे या माध्यमातून पुढे नेण्याचा ,’हरी नरके विचारपीठ’ स्थापन करुन त्यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी हरी नरके वक्तृत्व स्पर्धा घेण्याचा संकल्प या सभेत करण्यात आला
याप्रसंगी डॉ. दहिवले एस.एम., अन्वर राजन, प्रशांत कोठडिया, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार कमल ढोले पाटील, अभय छाजेड, प्रविण गायकवाड, शंकरराव सातव, सुखदेव बनकर, ॲड श्रीकांत आगस्ते, ॲड राहूल दिंडोरकर, ॲड सागर नेवसे, ॲड अनिल तांबे, प्रा लक्ष्मण हाके, वसंत लोंढे व इतर अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, साहित्यिक, विधि अशा विविध क्षेत्रातील मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.अनेक मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना व कार्याला उजाळा देत असताना अनेकांच्या भावना अनावर झाल्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले. तेव्हा उपस्थितांचे अश्रू अनावर झाले.
‘हरी नरके विचारपीठ’ स्थापन करुन त्यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी हरी नरके वक्तृत्व स्पर्धा घेण्याचा संकल्प व नव साहित्यिकांसाठी प्रा हरी नरके साहित्य पुरस्कार आयोजित करण्याची घोषणा हरी नरके विचारपीठातर्फे ॲड. मंगेश ससाणे यांनी केली. याप्रसंगी हरी नरके यांच्या पत्नी संगीता नरके, त्यांच्या कन्या प्रमिती नरके उपस्थित होत्या, प्रमिती नरके यांनी त्यांच्या लहानपणी च्या अनेक आठवणी सांगितल्या .
कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी वेल्फेअर फाऊंडेशन, आनंदी प्रतिष्ठान, यंग पृथ्वी फाउंडेशन, युवा माळी संघ यांच्या तर्फे मृणाल ढोले पाटील, ॲड मंगेश ससाणे, गौरी पिंगळे, सपना माळी -शिवणकर, सुनिता भगत, कमलाकर दरवडे यांच्यातर्फे करण्यात आले . महात्मा फुले वसतिगृह यांच्या मार्फत सभागृह उपलब्ध करून देण्यात आले. कार्यक्रमाची सांगता महात्मा फुले यांच्या अखंडाचे वाचन करून करण्यात आले. अखंडाचे वाचन कुमार आहेर, रघुनाथ ढोक यांनी केले