देशात सध्या पत्रकारितेवर आणीबाणी लादण्याचा सत्ताधारी यांचा प्रयत्न : राज ठाकरे


पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )
महायुतीत सहभागी होण्याची चर्चा असलेले ‘मनसे’चे अध्यक्ष गेल्या काही दिवसांपासून भाजपवर सडकून टीका करीत आहेत. पिंपरी-चिंचवडमधून त्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पत्रकारितेवरून हल्लाबोल केला. देशात १९७७च्या आणाबाणीत असलेली बंधने सध्या पत्रकारितेवर पुन्हा लादल्याची टीका ठाकरेंनी केली. ठाकरेंच्या निशाणामुळे भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असून ते राज ठाकरेंना काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष आहे
– पूर्वी दूरदर्शनवर ‘ब्रेकिंग न्यूज’ यायची, तेव्हा पोटात गोळा यायचा, अशी आठवण सांगताना ठाकरे म्हणाले, “आता खोट्या बातम्या आणि नेत्यांचे वाह्यात बोलणे आता दाखविणे बंद करून चांगल्या बातम्या दाखवा. असे आवाहन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी त केले
अजित पवार सत्तेत गेले, याचा पत्रकारांना राग यायला पाहिजे होता. पंतप्रधानांनी त्यांच्यावर ७० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला. यानंतर सहा दिवसांतच ते सत्तेत गेले. महाराष्ट्रात काय चालू आहे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला
.
भारतीय जनता पक्षाने उभारलेल्या महायुतीत मनसेचे स्थान राहणार असल्याची चर्चा रंगत असतानाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपवर बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. कर्नाटकातील निकाल, महाराष्ट्रातील आमदारांची पळवापळवी, त्यानंतर खड्डे, टोल वसूलीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांना चिमटे काढणाऱ्या राज यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पत्रकारितेवर बंधने आल्याचे पटवून देताना राज यांनी नकळतपणे का होईना मोदींवर हल्ला केला. यामुळे भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे देशातील पत्रकारितेचा विचार करता महाराष्ट्रात ती जिवंत असल्याचे ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकारांवरील हल्ले हे चुकीचे व निषेधार्थ असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकारांवर हल्ले का होतात, याचाही विचार व्हावा, असे ते म्हणाले. खोट्या बातम्यांतून हे हल्ले होताच असे सूचित करून अशा बातम्या थांबविण्याचा सल्लाही राज यांनी दिला