भारतीय विद्या भवन मध्ये रंगली ‘कथक संध्या…भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम…


पुणे ःऑनलाईन परिवर्तनाचा सामना -भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘कथक संध्या ‘ या नृत्य सादरीकरण कार्यक्रमाला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला.हा कार्यक्रम शनीवार,१९ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.ज्येष्ठ कथक प्रशिक्षक शिला मेहता आणि सहकारी तसेच कथक प्रशिक्षक प्रेरणा देशपांडे यांच्या शिष्या सहभागी झाल्या. हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १७७ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.
शीला मेहता यांनी शिव स्तुती, ताल, गीता सार सादर केला. त्यांच्या सहकाऱ्यांनी ठुमरी आणि इतर नृत्ये प्रभावी पणे सादर केली. कार्यक्रमात प्रेरणा देशपांडे यांच्या शिष्यांनी भटीयार रागातील गणेश वंदना ने प्रारंभ केला. ताल, पारंपारिक तराणा सादर केले गेले.या सादरीकरणाला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला.