उपमुख्यमंत्री अजीत पवार आमचे नेते: शरद पवार,

.पक्षातील काही जणांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही. लोकशाहीत त्यांना त्यांचा अधिकार आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानाचे समर्थन केले आहे
.तसेच अजित दादा आमचे नेते आहेत. या सुप्रिया सुळे यांच्या विधानाचे देखील शरद पवारांनी समर्थन केले. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.गुरुवारी खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीमधील फुटीबाबत प्रतिक्रिया दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असे सांगतानाच राज्यात एक उपमुख्यमंत्री भाजपचे (BJP) आहेत. दुसरे कुठले आहेत? कुठल्या पक्षाचे आहेत? मला माहिती नाही, असे सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले होते.आज (शुक्रवार) सकाळी शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला
. यावेळी त्यांना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावेळी शरद पवार म्हणाले, ते आमचेच नेते आहेत, राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नाही. वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा निर्णय आहे. लोकशाहीत त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. फूट पडणे याचा अर्थ पक्षातून एक मोठा गट वेगळा होणं, अशी परिस्थिती इथे झालेली नाही, असंही शरद पवार म्हणाले.
आज सकाळी पवार साहेबांनी अजीत दादा आमचे नेते आहेत म्हटल्यावर अजीत पवार यांनी नो कंमेंट्स असे उत्तर देऊन नव्या राजकीय चर्चेन वळण घेतलं आहेआज सकाळी अर्थमंत्री अजीत पवार यांनी महापालिकेत येऊन विविध विकास कामा बाबत आढावा बैठक घेतली आहे त्या नंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे