३१ पासून ‘पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा’एम आय टी च्या व्हिज्युअल आर्ट,एज्युकेशन विभागाकडून आयोजन…

पुणे :

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या डिपार्टमेंट ऑफ व्हिज्युअल आर्ट तसेच डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन तर्फे ‘शाश्वत आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा सशुल्क असून दि.३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी २ ते ५ या वेळेत कोथरूडमधील एम आय टी युनिव्हर्सिटीच्या विश्वकर्मा इमारतीच्या टेरेसवर होणार आहे.कुलगुरु डॉ आर एम चिटणीस तसेच अधिष्ठाता प्रा.विनय मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे.

अधिक माहितीसाठी 70203 22856 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.डिपार्टमेंट ऑफ व्हिज्युअल आर्ट च्या प्रोग्रॅम डायरेक्टर डॉ.श्रुती निगुडकर,डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन च्या प्रोग्रॅम डायरेक्टर डॉ.अर्चना चौधरी यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

Latest News