सराईत गुन्हेगार सागर उर्फ यल्ल्या कोळानट्टी यांच्या सह 19 साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

पुणे- ( ऑनलाइन परिवर्तनाचा सामना)-

पुणे शहरातील मंगला टॉकीज परिसरात तरूणाच्या खून प्रकरणातील सराईत आरोपी सागर उर्फ यल्ल्या कोळानट्टी आणि त्याच्या 19 साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार केलेली ही 55 कारवाई आहे.

टोळी प्रमुख सागर उर्फ यल्ल्या इराप्पा कोळानट्टी (वय 35 रा. ताडीवाला रोड ), सुशील अच्युतराव सुर्यवंशी (वय 27), मल्लेश शिवराज कोळी (वय 24), मनोज विकास हावळे (वय23), रोहन मल्लेश तुपधर (वय 23), शशांक उर्फ ऋषभ संतोष बेंगळे (वय 21), गुडगप्पा फकीराप्पा भागराई (वय 28), किशोर संभाजी पात्रे (वय 20), साहील उर्फ सल्ल्या मनोहर कांबळे (वय 20), गणेश उर्फ गणपत शिवाजी चौधरी (वय 24), रोहीत उर्फ मच्छी बालाजी बंडगर (वय 20), विकी उर्फ नेप्या काशीनाथ कांबळे (वय 22), इम्रान हमीद शेख (वय 31) लॉरेन्स राजू पिल्ले (वय 36), आकाश सुनिल गायकवाड उर्फ चड्डी (वय 22), विवेक भोलेनाथ नवघरे (वय 25), अक्षय उर्फ बंटी विजय साबळे (वय 25), विनायक गणेश कापडे (वय 21), प्रदिप संतोष पवार (वय 21), सौरभ बाळु ससाणे (वय 20) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

सराईत सागर उर्फ यल्ल्या टोळीने शिवाजीनगर परिसरात नितीन म्हस्के आणि त्याच्या मित्रावर हल्ला केला. त्यामध्ये नितीन म्हस्केचा मृत्यू झाला होता. टोळी प्रमुख सागर उर्फ यल्ल्या याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन बेकायदेशीर मार्गाने फायदा करुन घेण्यासाठी गुन्हे केले आहेत

. टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय गोडसे यांनी उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांच्यावतीने अपर आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांना सादर केला. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सागर उर्फ यल्ल्या कोळानट्टी टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे.

आतापर्यंत 55 टोळ्यातील 320 हून अधिक सराईतांना जेरबंद केले आहे. ही कामगिरी आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक अपर आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, सहायक पोलिस आयुक्त वसंत कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलिस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड सहायक पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे , पोलिस अंमलदार मेमाणे, दिलीप नागर, रोहित झांबरे यांनी केली

Latest News