पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्यावतीने पवना धरण जलपूजन सोहळा उत्साहात…

पवना धरण खरोखरच 100 टक्के भरल्याची पत्रकार बांधवांनी केली पाहणी

पिंपरी-चिंचवडः ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-

पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यातील काही भाग आणि एमआयडीसीची तहान भागविणारे पवना धरण सोमवारी (दि. 21) सायंकाळी पाचपर्यंत 100 टक्के भरले आहे. त्यामुळे वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. यंदा मौसमात पावसाने उशिरा हजेरी लावली. जून महिन्याच्या अखेरीस पाऊस सुरू झाला. पवना धरण 100 टक्के भरलेले आहे. पवना धरण 100 टक्के भरल्यानंतर महापौरांच्या हस्ते धरणावर जाऊन रितसर जलपूजन केले जात होते. मात्र दोन वर्षापासून प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून जलपूजनास फाटा दिला जात आहे. महापालिका प्रशासनाला या जलपूजनाचा विसर पडल्यामुळे पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने व पुढाकाराने रविवार, दिनांक 3 सप्टेंबर रोजी पवना धरणावर जावून जलपूजन करण्यात आले. यावेळी पवना धरण खरोखरच 100 टक्के भरल्याची या पत्रकार बांधवांनी खात्री केली. पत्रकार बांधवांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे.

रविवारी सुट्टी असल्यामुळे विकेंडचे औचित्य साधून शहरातील नागरिक मावळात पर्यटनाकरिता जात असतात. मात्र पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातील सदस्यांनी पवनामाईचे जलपूजन करून धरण परिसराची पाहणी करत धरण 100 टक्के भरल्याची अनुभूती घेतली. पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आणि पिंपरी चिंचवड डिजीटल मीडिया पत्रकार संघ व त्यांचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, आणि संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सर्व कार्यकारणी पत्रकार संघ एकत्र येऊन पवना धरण 100 टक्के भरले म्हणून प्रत्यक्ष धरणावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी धरण खरोखरच 100 टक्के भरले आहे. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने बापूसाहेब गोरे यांनी श्रीफळ फोडून जलपूजन केले.

या पत्रकार बांधवांची प्रामुख्याने उपस्थिती…
यावेळी पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे संस्थपाक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, प्रिंट मीडियाचे अध्यक्ष दादाराव आढाव, जेष्ठ पत्रकार संतलाल यादव, बाबू उर्फ सुनील कांबळे, कलिंदर शेख, गणेश शिंदे, जितेंद्र गवळी, गणेश शिंदे, मुकेश जाधव, विनय लोंढे, संतोष जराड, युनूस खतीब, आदी पत्रकार बांधव यावेळी जलपूजन करिता उपस्थित होते.

प्रशासकीय राजवटीत जलपूजनास पडलाय विसर?
महापालिकेत लोकप्रतिनिधी असताना पवना धरण 100 टक्के भरल्यानंतर महापौरांच्या हस्ते धरणावर जाऊन रितसर जलपूजन केले जात होते. मात्र, 12 मार्च 2022 पासून महापालिका बरखास्त होऊन प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासकीय राजवटीत आयुक्त किंवा अधिकार्‍यांच्या हस्ते जलपूजनास गेल्या वर्षीपासून फाटा देण्यात आला आहे. यंदाही जलपूजन होणार नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरवर्षी पवना धरण 15 ऑगस्टपर्यंत 100 टक्के भरते. यंदा सहा दिवस उशिरा म्हणजे 21 ऑगस्टला भरले आहे. हे पाणी पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेल इतके आहे. पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने याची पाहणी व जलपूजन करण्यात आले.

Latest News